बॅकवॉटरची जलवाहिनी लिकेज; दाेन दिवस उशिराने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:43+5:302021-07-14T04:38:43+5:30

बीड : माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील एअर वॉल लिकेज झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. ...

Backwater aqueduct leakage; Water supply late in the day | बॅकवॉटरची जलवाहिनी लिकेज; दाेन दिवस उशिराने पाणीपुरवठा

बॅकवॉटरची जलवाहिनी लिकेज; दाेन दिवस उशिराने पाणीपुरवठा

Next

बीड : माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील एअर वॉल लिकेज झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी दुरुस्तीसाठी यंत्रणा गेली; परंतु पावसामुळे काम करता आले नाही. त्यामुळे हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे. बीड पालिकेने ही माहिती दिली आहे.

बीड शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून येणाऱ्या जलवाहिनीचे काम १० वर्षांअगोदर झालेले आहे. त्यामुळे जलवाहिनी गंजली असून, वारंवार लिकेज होत आहे. याचा परिणाम बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. मंगळवारीही देवडी गावाजवळ एक एअर वॉल लिकेज झाला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा थांबविण्यात आला. पालिकेची यंत्रणा दुरुस्तीसाठी तात्काळ गेली; परंतु देवडी परिसरात पाऊस जास्त असल्याने काम हाती घेता आले नाही. पाऊस कमी होताच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे, असे असले तरी हद्दवाढ भागातील नागरिकांना दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, अभियंता राहुल टाळके, पाणीपुरवठा अधिकारी अमोल बागलाने यांनी केले आहे.

130721\13_2_bed_20_13072021_14.jpeg

देवडी गावाजवळ लिकेज झालेला हाच तो एअर वॉल.

Web Title: Backwater aqueduct leakage; Water supply late in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.