खिळद येथे परसातील १६ कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:38+5:302021-02-05T08:20:38+5:30

कडा (ता. आष्टी, जि. बीड) : आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जे यांच्या परसातील १६ कोंबड्या अज्ञात रोगाने ...

Backyard chickens die at Khilad | खिळद येथे परसातील १६ कोंबड्यांचा मृत्यू

खिळद येथे परसातील १६ कोंबड्यांचा मृत्यू

Next

कडा (ता. आष्टी, जि. बीड) : आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जे यांच्या परसातील १६ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याची घटना शनिवारी घडली. शुक्रवारी सकाळी तुषार गर्जे यांनी चारापाणी केले. तर शनिवारी सकाळी अज्ञात रोगाने दगावल्याचे निदर्शनास आले. आजवर तालुक्यात अनेक पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची धास्ती असली तरी आतापर्यंत पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मग शनिवारी अचानक मेलेल्या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अहवाल आल्यावरच समजणार आहे. शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विष्णू साबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली.

आठवड्यापूर्वी ५२ कोंबड्यांचा मृत्यू

आठ दिवसांपूर्वी तुषार गर्जे यांच्या ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्या होत्या. त्यावेळी पशुसंर्वधन विभागाला तपासणीसाठी नमुने घेता आले नव्हते. आता परत याच ठिकाणी १६ कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना विचारणा केली असता, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झालेला नसून आता खिळद येथील कोंबड्यांचा अहवाल येताच निदान समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Backyard chickens die at Khilad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.