बाला उपक्रमातून शाळांचे रूप पालटले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:00+5:302021-08-23T04:35:00+5:30

अनिल महाजन धारूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे बाला उपक्रमातून शिक्षक व लोकसहभागातून परिवर्तन होत असून, बोलक्या भिंती, ...

The Bala initiative changed the face of schools - A | बाला उपक्रमातून शाळांचे रूप पालटले - A

बाला उपक्रमातून शाळांचे रूप पालटले - A

Next

अनिल महाजन

धारूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे बाला उपक्रमातून शिक्षक व लोकसहभागातून परिवर्तन होत असून, बोलक्या भिंती, परिसरातील होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होणार असून या उपक्रमातून तालुक्यातील जवळपास १५० शाळांचा चेहरा बदलला आहे. तालुक्यात शैक्षणिक बदलासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बाला हा उपक्रम तालुक्यात सर्व शाळांमध्ये खासगी व संस्थांच्या शाळेत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सहभाग घेतलेल्या शाळांचा सर्व दृष्टीने कायापालट होत असल्याचे दिसत आहे. ज्ञानमंदिरात होणारा बदल हा विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरत असून आठही केंद्रात हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमात शाळेची रंगरंगोटी, परिसरातील बोलक्या भिंती करण्याला प्राधान्य दिले आहे. शाळेचा परिसर निसर्गरम्य केला आहे. झाडांच्या बाजूने कठडे व त्यांची रंगरंगोटी केली आहे. नैसर्गिक सावली निर्माण करून तेथे वाचन भिंती तयार केल्या आहेत. सहज वापर करता यावा म्हणून विद्यार्थ्यांच्या उंचीची फळे तयार केली जात आहेत. शाळेच्या आवारात पाणी पावसाचे पाणी साठे तयार केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाशी विद्यार्थी जोडण्यासाठी ई लर्निंग सुविधा इतर व्यवस्था उभारणीस प्राधान्य देण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, डी. बी. कोकणे, सय्यद हकीम, विलास मुळे, सुरवसेसह सर्व मुख्याध्यापक शिक्षक व व्यवस्थापन समित्या परिश्रम घेत आहेत.

----- या गावांच्या शाळांचा सहभाग

तालुक्यातील आरणवाडी, चोरांबा, अंबेवडगाव , गांवदरा, पहाडी पारगाव, धुनकवड, कारी, सोनीमोहा, चाटगाव, देवठाणा आम्ला, हिंगणी, आसरडोह, रुईधारूर, अंजनडोह, पिंपरवाडा, कोळपिंप्री, आवरगाव, पांगरी, खोडस, मैंदवाडी, खामगाव, घागरवडा, सिंगनवाडी, जायभायवाडी, संगम, धारूर आदी गावच्या व वाड्या तांड्यावरील जवळपास दीडशे शाळांचा चेहरा या उपक्रमामुळे बदलत आहे.

Web Title: The Bala initiative changed the face of schools - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.