बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:12+5:302021-01-03T04:34:12+5:30
या शिबिरात ३८ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. काँग्रेस पक्षाने संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत ७६९ जणांनी वेळोवेळी झालेल्या शिबिरांत ...
या शिबिरात ३८ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. काँग्रेस पक्षाने संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत ७६९ जणांनी वेळोवेळी झालेल्या शिबिरांत रक्तदान केले आहे. अंबाजोगाईत रिंगरोडनजीक असणाऱ्या मोदी लर्निंग सेंटर येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संकेत राजकिशोर मोदी, नगरसेवक सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, गोविंद पोतंगले, राणा चव्हाण, विजय रापतवार, अतुल कसबे, सचिन जाधव, भारत जोगदंड, अमोल मिसाळ यांच्यासह प्राचार्य डॉ. संतोष तरके, मुख्याध्यापक सी.व्ही. गायकवाड, विनायक मुंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराचे उद्घाटन संकेत राजकिशोर मोदी यांनी स्वतः रक्तदान करून केले. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढी विभागाच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे टप्याटप्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे.