बालाजी मंदिरात घुमला व्यंकट रमणा गोविंदाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM2018-02-26T00:48:52+5:302018-02-26T00:49:00+5:30
बीड शहरातील प्राचीन बालाजी मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा उत्सवात ‘व्यंकट रमणा गोविंदा’ चा गजर घुमला. तब्बल बारा वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगप्रसंगी शेकडो भाविकांनी गाभाºयात प्रवेश करुन भगवान बालाजींच्या स्पर्शदर्शनाची अनुभुती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील प्राचीन बालाजी मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा उत्सवात ‘व्यंकट रमणा गोविंदा’ चा गजर घुमला. तब्बल बारा वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगप्रसंगी शेकडो भाविकांनी गाभाºयात प्रवेश करुन भगवान बालाजींच्या स्पर्शदर्शनाची अनुभुती घेतली.
येथील पेठ भागातील बालाजी मंदिराच्या जणर््ीोध्दारानंतर येथे मागील तेरा वर्षांपासून ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच बारा वर्षानंतर अष्टबंधना पर्व आल्याने शनिवारपासून पूजा, होमहवन इ. धार्मिक विधी होत आहे. रविवारी अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजेदरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत भक्तांनी सोवळे नेसून गाभाºयात शिस्तीत प्रवेश करत मूर्ती स्पर्शदर्शन घेतले. या पूजेनिमित्त मंदिरात तयार केलेल्या पाच हवनकुंडमध्ये होमविधी सुरु होता. तीन तास चाललेल्या सोहळ्यात शेकडो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. गोविंदा ग्रुपच्या तरुणांनी दर्शन व्यवस्था सांभाळली. सोमवारी पूर्णाहुतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळा
अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा म्हणजे तपपूर्तीनंतर येणारा अपूर्व योग असतो. हा सोहळा प्राणप्रतिष्ठापणा प्रमाणेच असतो. दरवर्षी मंदिरात होणाºया ब्रह्मोत्सवा प्रमाणेच सर्व विधी झाले. प्रत्यक्ष मूर्तीदर्शनामुळे भाविक धन्य झाले.
तिरुमलाचे ब्रह्मवृंद
तिरुमला तिरुपती येथील देवस्थान वेदपाठशाळेचे उपाध्यक्ष श्रीधर स्वामी, प्रधान पुजारी रामा स्वामी यांच्यासह ६ ब्रह्मवृंदांनी अष्टबंधना पूजेचे पौराहित्य केले.
उत्तम दर्शन व्यवस्था
तिरुमला येथील दाक्षिणात्य वाद्यवृंद पथकाच्या सुरात सकाळपासूनच पूजा, होमहवन सुरु होते. भगवंत मूर्तीला फुलांचा श्रृंगार करण्यासाठी खास तिरुमला येथून फुलारी आले होते.