मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:52 AM2018-10-11T00:52:01+5:302018-10-11T00:52:32+5:30

तालुका दुष्काळात होरपळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

The Balgadi Front of the Mansa Tehsil | मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

Next
ठळक मुद्देटाळ वाजवत आंदोलक झाले सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुका दुष्काळात होरपळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
माजलगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता होरपळत आहे. सरकार तालुका दृष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी येथील मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, सुंमत धस महिला जिल्हाध्यक्ष रेखा आंबुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांसह जनसामान्यांच्या जीवनाशी निगिडत मागण्यांसाठी येथील मौलाना आझाद चौकातून बैलगाडीसह टाळ वाजवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा काढण्यात आला. सदरील मोर्चा येथील तहसील कार्यालयावर धडकला. माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, पेट्रोल डिझेलची दर वाढ कमी करा, सुशिक्षित बेरोजगारांना विविध महामंडळासह मुद्रा योजनेतून कर्ज वाटप कर, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे या व इतर मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसे तालुकाध्यक्ष आत्माराम ठिसले, जयदिप गोल्हार, गणेश खोटे, संजय होके, गणेश वाघमारे, रमेश जोगडे, मछिंन्द्र राऊत, गोविंद देशमाने, मारोती दुगनु, महिला तालुकाध्यक्ष रेखा डाके, वडवणीच्या महिला अध्यक्ष दीक्षा डोंगरेसह अन्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
जोरदार घोषणाबाजी
शहरातील आझाद चौकातून बैलगाडीसह टाळ वाजवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

Web Title: The Balgadi Front of the Mansa Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.