पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 01:19 PM2021-07-16T13:19:37+5:302021-07-16T13:21:03+5:30

Pankaja Munde News : भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांच्याविरुद्ध या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Bank account seal of Pankaja Munde's sugar factory; EPFO's big action | पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील; ईपीएफओची मोठी कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देकारखान्याचे कर्मचारी, कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा केली नव्हतीमार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी

बीड :  भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले असून, पीएफच्या थकबाकी पोटी ९२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाने केली. (ank account seal of Pankaja Munde's Vaidhynath sugar factory of Pangari, Parali )  

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांच्याविरुद्ध या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या ( पांगरी,परळी वैद्यनाथ, जि. बीड ) आस्थापनेची मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची १ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस. आर. वानखेडे यांनी ही कारवाई पार पाडली. कारवाईवर समाधान व्यक्त करीत क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी सर्व भविष्य निधी थकबाकीदारांना थकीत भविष्य निधी देण्याकांचा भरणा त्वरित करण्याची सूचना केली.  

निवडणूक काळात वेतनाचाही मुद्दा राहिला चर्चेत 
कारखान्यातील कामगार- कर्मचाऱ्यांचा पगारही थकीत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशस्वरावर उपोषण सुरु केले होते. त्यामुळे निवडणूक आकळत कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा मुद्दा खूप चर्चेत राहिला. आता पीएफचा प्रश्न समोर आला आहे. उर्वरित थकीत रक्कमही भरावी लागणार आहे.

Web Title: Bank account seal of Pankaja Munde's sugar factory; EPFO's big action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.