बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:01 AM2018-05-31T00:01:15+5:302018-05-31T00:01:15+5:30

नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपाला शहरातील सर्व बॅँक कर्मचारी व अधिका-यांनी प्रतिसाद देत बुधवारी एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले तर पहिल्या दिवशी सुमारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

Bank employees' property in Beed; Work jam | बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प

बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप; कामकाज ठप्प

googlenewsNext

बीड : नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपाला शहरातील सर्व बॅँक कर्मचारी व अधिका-यांनी प्रतिसाद देत बुधवारी एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. या संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले तर पहिल्या दिवशी सुमारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

बॅँक कर्मचाºयांची वेतनवाढ आणि करार तसेच इतर मागण्यांसाठी येत्या ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या ४८ तासांच्या देशव्यापी संपाला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील साठे चौकातील बँक आॅफ महाराष्टÑच्या मुख्य मुख्य शाखेसमोर सर्व कर्मचारी, अधिकाºयांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केली. बीड शहर व लगतच्या शाखेतून २०० कर्मचारी एकत्र आले होते.

या संपामुळे जिल्हयातील सर्व राष्टÑीयकृत बँकेच्या ९० शाखा बंद होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होते. निदर्शन आंदोलनाचे प्रास्ताविक विलास कोकीळ व दिगंबर मुंडे यांनी केले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी विपीन गिरी, अश्विनी बांगर (महाराष्टÑ बँक), विजय चव्हाण, माधव जोशी, वैभव ढोले, विनोद नखाते, विनायक पाटील, ज्ञानेश्वर आवड (एसबीआय ) पवार (देना बॅँक) वसीम खान, पवार (बीओबी) यांनी प्रयत्न केले.

युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियनशी संलग्न नऊ संघटनांच्या सदस्यांनी निदर्शने केली यात एसबीआय, बॅँक आॅफ महाराष्टÑ, कॅनरा, पंजाब नॅशनल बॅँक, बॅँक आॅफ बडोदा, सेंट्रल बॅँक, सिंडीकेट तसेच इतर सर्व राष्टÑीयकृत बॅँकांसह एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅँकेच्या कर्मचाºयांचा समावेश होता.

कामगार तसेच ग्राहकविरोधी सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. धनदांडग्यांकडून कर्जवसूली तसेच कर्ज बुडव्यांची यादी जाहीर करावी, बॅँक बोर्ड ब्यूरो बरखास्त करा आदी मागण्या यावेळी झाल्या. युएफबीयू या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्व राष्टÑीयकृत बॅँकांच्या ९० शाखांचा कारभार बंद राहिल्याने बुधवारी सुमारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. तर गुरुवारीही संप सुरु राहिल्यास हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bank employees' property in Beed; Work jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.