बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:38 PM2018-12-03T23:38:57+5:302018-12-03T23:39:24+5:30
बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिला आहे.
बीड येथे महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आ. पाटील आले होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष आ. पाटील यांनी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील कर्ज देण्यासंदर्भात सर्व बँकांना सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दौºयापूर्वी महामंडळाच्या माध्यमातून कर्जाची ५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देखील देखील जवळपास दीड महिन्यापूर्वी बँक अधिकाºयांची बैठक घेऊन कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. आजपर्यंत फक्त ११० कर्ज प्रकरणे मंजूर झाली असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. त्यांना पीपीटीच्या माध्यमातून योजनेची परिपूर्ण माहिती देण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळात योजना माहिती नसल्यामुळे कर्ज वाटप करता आले नाही, हे कारण बँक व्यवस्थापकांना सांगता येणार नाही. तसेच व्यवस्थापकांनी देखील कर्ज वाटप प्रक्रियेत लबाडी करु नये अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच कर्ज वाटपात बँका सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व इतर पदाधिकाºयांची उपस्थिती बैठकीस होती.
तरुणांनी कागदपत्रांची पूर्तता करावी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांनी कागदपत्रांची पूर्तता योग्यरित्या करावी. जेणेकरुन कागदपत्रे नसल्यामुळे कर्ज मंजूर करता आले नाही, हे कारण बँकेला सांगता येणार नाही. तसेच लाभार्थ्यांनी कर्ज मिळाल्यानंतर त्याच कागदपत्रांच्या माध्यमातून ही माहिती महामंडळास कळवावे. त्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचे व्याज भरले जाईल असे महामंडळ अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील म्हणाले.
कार्यकर्ते नारळ, हार घेऊन सत्कार करतील
४मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे कर्ज प्रकरणात जिल्ह्यातील बँकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
४कर्जासंदर्भात दोन वेळेस बैठक घेऊन बँकेच्या व्यवस्थापकांना सूचना व विनंती करण्यात आली होती.
४कर्ज घेण्यासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता योग्यरित्या करुन देखील बँकेने टाळाटाळ केल्यास, कार्यकर्ते नारळ व हार घेऊन त्या अधिकाºयांचा सत्कार करतील असा निर्वाणीचा इशारा यावेळी आ. पाटील यांनी बँकांना दिला.