आॅफलाईन विमा भरून घेण्यास बँकांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:59 PM2019-11-06T23:59:51+5:302019-11-07T00:00:22+5:30
वामानावर आधारित फळपीक विमा योजना अवलंबून आहे. यामध्ये आर्द्रता, तापमानवाढ, पर्जन्य यासह इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळतो. मात्र, आॅफलाईन पद्धतीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा स्वीकारण्यास बँकांनी असमर्थता दर्शविली आहे.
बीड : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अवलंबून आहे. यामध्ये आर्द्रता, तापमानवाढ, पर्जन्य यासह इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळतो. मात्र, आॅफलाईन पद्धतीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा स्वीकारण्यास बँकांनी असमर्थता दर्शविली आहे. शासन आदेश असतानाही ते धाब्यावर बसवून बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.
७ नोव्हेंबर ही मोसंबी, द्राक्ष, केळी या पिकांसाठी विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. मागील काही दिवसांपासून महा-ई सेवा केंद्रावर फळपीक विमा भरणा सुरु आहे. यामध्ये मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा यांचा समावेश आहे. या विम्याची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडमध्ये भरली जाते.
हवामानावर आधारित असल्यामुळे गारपीट झाल्यानंतर अनेक शेतक-यांनी योजनेत सहभाग नोंदवला. परंतु विमा भरणाºया पोर्टलवर गारपीटीसाठी विमा भरण्याची सोय नसल्याने बँकेत भरणा करण्याच्या सूचना संबंधित विभागाने शेतकºयांना दिल्या होत्या. तसेच बँकांनी देखील आॅफलाईन पध्दतीने हा विमा भरुन घ्यावा अशा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील शेतक-यांकडून बँकांनी विम्याची रक्कम भरुन घेतली नाही. त्यामुळे बागायतदार शेतकºयांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. बँकेकडे वारंवार विनंती करुनही राष्ट्रीयीकृत तसेच इतर बँकांनीही शेतकºयांना वेठीस धरले आहे.