मराठा तरुणांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:19 AM2018-11-04T00:19:18+5:302018-11-04T00:20:13+5:30

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बॅँकेच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे.

Banks should provide loans to Maratha youth | मराठा तरुणांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे

मराठा तरुणांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे

Next
ठळक मुद्देनरेंद्र पाटील यांची सूचना : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बॅँकेच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे.त्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याची सूचना बँकांना दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बीड येथील आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, मराठा मोर्चा समन्वय समितीचे अ‍ॅड. मंगेश पोकळे, भाजयुमोचे स्वप्निल गलधर, प्रमोद पुसरेकर,शिवसेनेचे गणेश मस्के व महामंडळ सदस्यांची उपस्थिती होती.
महामंडळाच्या पुढील उपक्रमाविषयी बोलताना पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडे एकूण १७० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध आहे. यामध्ये राज्य शासनाच्या वतीने अजून ४०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक मराठा तरुणांनी घ्यावा व उद्योजक बनावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
राज्यसरकारने महामंडळासाठी पुरेसा निधी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजातील तरूणांना उद्योगासाठी बँकांकडून अर्थसहाय्य मिळेल. आज पर्यंत मराठा समाजातील तरूण उद्योगांसाठी कधीच कर्ज मागत नव्हता. त्यामुळे यावेळी कजार्साठी लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी अडथळे येऊ शकतात. मात्र या महामंडळाबाबतची सर्व माहिती आॅनलाईन उपलब्ध आहे. कर्जासाठी अर्ज देखील आॅनलाईनच करावयाचा आहे. याबाबतीत नागरिकांच्या माहितीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण देखील घेण्यात येणार असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. यावेळी शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Web Title: Banks should provide loans to Maratha youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.