बापरे, एकट्या स्वारातीत २४६ कोरोनाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:49+5:302021-02-06T05:01:49+5:30
सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात कोरेाना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या होत्या. परंतु, उपचाराबाबत कायम तक्रारी होती. आतापर्यंत आरोग्य ...
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात कोरेाना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या होत्या. परंतु, उपचाराबाबत कायम तक्रारी होती. आतापर्यंत आरोग्य विभागाकडे ५८२ कोरोनाबळींची नोंद झाली आहे. यात एकट्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात २४६ मृत्यूची नोंद आहे. त्यापाठोपाठ जिल्हा रुग्णालयात १४० मृत्यू झाले असून, परजिल्ह्यातही १४१ मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याची प्रमाण कमी दिसत असले तरी मृत्युदर ३ टक्केच्या खाली आणण्यात अद्यापही आरोग्य विभाग आणि प्रशासनाला यश आलेेले नाही. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजारांकडे जात आहे, तर कोरोनामुक्तीचा टक्काही ९५ पेक्षा जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. आयसीएमआरच्या पोर्टलवर ५५७ मृत्युची नोंद असली तरी ऑफलाइन पद्धतीने ५८२ मृत्युची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक २४६ मृत्यू हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात झाले आहेत. त्यानंतर जिल्हा रुग्णालयतील मृत्यूचा आकडाही १४० असल्याने चिंता व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यातील रहिवासी, परंतु इतर जिल्ह्यात उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही १४१ आहे. इतर मृत्युही खासगी रुग्णालयांमध्ये झाले आहेत. एकूणच मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने उपचारात दर्जा निर्माण करून रुग्णांची काळजी घेण्यासह तक्रारी कमी करण्यावर भर देणे अपेक्षित आहे. तशी मागणीही सामान्यामधून होत आहे.
या वेळेत सर्वाधिक मृत्यू
अनेक रुग्ण रुग्णालयात उशिराने दाखल झाल्याने त्यांचे मृत्यू झाले. यात रुग्णालयात आल्यापासून २४ तासांपर्यंत १३७ मृत्यू झाले आहेत. त्यानंतर २४ ते ७२ तासांत १२६ मृत्यू, ७२ ते सात दिवसांपर्यंत १४१ मृत्यू, तर सात दिवसांपेक्षा जास्त राहिलेल्या, परंतु मृत्यू झालेल्यांची संख्या १७८ एवढी आहे.
----
तालुकानिहाय मृत्यू
बीड १४०
आष्टी ४९
पाटोदा २५
शिरुर १४
गेवराई ४०
माजलगाव ४४
वडवणी ११
धारुर ३४
केज ५३
अंबाजोगाई ९९
परळी ६८
इतर ५
-----
महिनानिहाय मृत्यू
जून ३
जुलै २९
ऑगस्ट ११८
सप्टेंबर १८३
ऑक्टोबर ११३
नोव्हेंबर ८०
डिसेंबर २९
जानेवारी २०२१ - २४
फेब्रुवारी २०२१ - ३
-----
वयानुसार मृत्यू
० ते ३० - ६
३१ ते ५० - ८७
५१ ते ६० - १२९
६१ ते ६५ - ९६
६६ ते ७० - १०८
७० पेक्षा जास्त - १५६
-----
लिंगनिहाय मृत्यू
पुरुष - ४२४
महिला - १५८