बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतूक यंत्रणेला लागली शिस्त; तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि श्रमाची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:28 PM2020-12-08T16:28:52+5:302020-12-08T16:33:05+5:30
गाळप हंगामात ऊस वाहतूक करणार्या वाहनांकडून वजन काट्यांवर आपला पहिला नंबर लागून लवकर रिकामे व्हावे, यासाठी मोठी ओढा-ताण होत असे.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील एन.एस.एल. ग्रुपच्या जय महेश शुगर इंडिस्ट्रीज या खाजगी साखर कारखान्यांने कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणार्यां वाहनांची वजन काठ्यावर होणारी जामिंग रोखण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर केला आहे. बारकोड प्रणाली वापर करणारा जय महेश कारखाना हा राज्यातील पहिला ठरला आहे. तर ऊस वाहतुकीत होणार्या अनागोंदीपणाला शिस्त लागली आहे.
तालुक्याती एन.एस.एल.गु्रपच्या जय महेश कारखाना हा सातत्याने शेतकर्यांना अधिकाअधिक भाव देण्या बरोबरच विवीध सेवा देण्याचे काम करण्यात अग्रेसर राहिलेला आहे. गाळप हंगामात ऊस वाहतूक करणार्या वाहनांकडून वजन काट्यांवर आपला पहिला नंबर लागून लवकर रिकामे व्हावे, यासाठी मोठी ओढा-ताण होत असे. यातून ऊस वाहतुकदारांमध्ये लहान-मोठे वाद निर्माण होत होते. त्यातून इतर वाहनांचा वजनाअभावी जामिंग होवून वेळ जात होता. याचा परिणाम कारखान्यांच्या दैनंदिन गाळपावर होत होता. त्यामुळे कारखान्यांने हा प्रकार रोखण्यासाठी नवीन शक्कल लढवली.
कारखान्यांचे उपाध्यक्ष गिरीष लोखंडे यांनी जी वाहने कारखान्यांस ऊस पुरवठा करतात त्यावर अत्याधुनिक अशी बारकोड यंत्रणा राबवण्याचे ठरवले. त्यानूसार 400 ट्रॅक्टर व 200 बैलगाड्या यांना बारकोड लावण्यात आले. ही वाहने कारखान्यांवर ऊस घेवून आल्यावर वजन काट्यावर येताच त्यांचे स्कॅनींग करण्यात येते. यानंतर वजनांची पावती संबधित ऊस वाहतुक करणार्या वाहन मालकास मिळते. तसेच शेतकर्यांना मोबाईलवर संदेश जातो. याबरोबरच शेतकर्यांच्या शेतातून वाहन बाहेर निघताच कारखान्यांच्या ऑफिसवर थांबून पावती घ्यावी लागत होते. परंतू आता बारकोड प्रणालीमुळे पावती शेतकर्यांना मोबाईलवर जाग्यावरच उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्लिप बॉयच्या पाठीमागे लागण्याची शेतकर्यांना गरज राहिलेली नाही, हे या प्रणालीमुळे शेतकर्यांच्या अधिक फायद्याचे ठरत आहे.
वजन काटा 'सीसीटीव्ही'च्या निगराणीखाली
जय महेश शुगर इंडस्ट्रिजला आलेला ऊसाचे वजन काट्यावर पारदर्शकपणा दिसून येत आहे. जर कुणास शंका आली तर तेथे वजनाच्या मणके ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कुणी वजन काट्यावर आक्षेप नोंदवला तर त्यांच्या शंकेचे निरसन केले जाते. वजन काट्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले असल्याने पारदर्शकता दिसुन येत आहे.
बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीस शिस्त
एन.एस.एल. ग्रुपच्या जय महेश शुगर इंडिस्ट्रीज शेतकर्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच भाग म्हणून बारकोड प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे कारखान्यांवर वजनासाठी होणारी ओढा-ताण, वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप होत आहे.
- गिरीष लोखंडे, उपाध्यक्ष, जय महेश शुगर इंडिस्ट्रीज