रस्त्यावरील मनोरुग्णांना मानवलोक जनसहयोगचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:53+5:302021-03-28T04:31:53+5:30

अंबाजोगाई : रस्त्यावर भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या मनोरुग्णांची लॉकडाऊनमुळे मोठी गोची निर्माण झाली होती. त्यांची गरज ओळखून मानवलोक ...

The basis of humanitarian assistance to the mentally ill on the streets | रस्त्यावरील मनोरुग्णांना मानवलोक जनसहयोगचा आधार

रस्त्यावरील मनोरुग्णांना मानवलोक जनसहयोगचा आधार

Next

अंबाजोगाई : रस्त्यावर भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या मनोरुग्णांची लॉकडाऊनमुळे मोठी गोची निर्माण झाली होती. त्यांची गरज ओळखून मानवलोक जनसहयोगने शहरातील सर्व भिक्षा मागणाऱ्या मनोरुग्णांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना त्यांच्या जागेवर डब्बे पोहच करण्यासाठी शाम सरवदे यांच्या पुढाकारातून यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

अंबाजोगाई शहरात मनोरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही मनोरुग्ण बसस्थानक परिसरात मुक्कामी असतात, तर अनेकजण शहरात इतरत्र भटकत असतात. बीड जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्व हॉटेल्स, खानावळी, चहाच्या टपऱ्या बंद ठेवल्या आहेत. शहरात भिक्षा मागून जीवन जगणारे हे मनोरुग्ण हॉटेल्सच्या भोवताली फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागतो. मात्र, अचानकच लॉकडाऊन झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या लॉकडाऊनमध्ये खाण्यापिण्यावाचून त्यांचे मोठे हाल झाले असते. या मनोरुग्णांवर उपासमारीची वेळ आली असती. त्यांची ही गरज ओळखून मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी मानवलोक जनसहयोगच्या माध्यमातून भिक्षा मागणाऱ्या या सर्व मनोरुग्णांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. मानवलोकमध्ये शहरातील सर्व मनोरुग्णांचे डब्बे तयार करून एक पाण्याची बाटली व जेवणाचा डबा असे सकाळ - संध्याकाळ त्यांना जेवणाचे डबे पुरवले जात आहेत. भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या या मनोरुग्णांना मानवलोक जनसहयोगच्या पुढाकाराने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्येही मानवलोक जनसहयोगने शहरातील ६५ मनोरुग्णांना सलग चार महिने दोन वेळा जेवणाचे डब्बे व पाण्याचा पुरवठा केला होता. शहरातील उपेक्षित, वंचितांच्या मदतीसाठी मानवलोकचा सातत्याने पुढाकार असतो.

===Photopath===

270321\img-20210326-wa0147_14.jpg

Web Title: The basis of humanitarian assistance to the mentally ill on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.