काळजी घ्या, रुग्णसंख्या दुपटीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:36+5:302021-03-16T04:33:36+5:30

बीड : मागील आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या शतकपार जात आहे. रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी महिन्यात ...

Be careful, double the number of patients | काळजी घ्या, रुग्णसंख्या दुपटीने

काळजी घ्या, रुग्णसंख्या दुपटीने

Next

बीड : मागील आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या शतकपार जात आहे. रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के होता, तर या महिन्यात दुप्पट वाढून १० झाला आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर १६ मे रोजी दुसऱ्या रुग्णाची. नंतर दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. सप्टेंबर महिन्यात तर विक्रमी रुग्णसंख्या वाढून कोरोनाबळीही वाढले होते; परंतु नंतर हळूहळू नोव्हेंबर महिन्यात नव्या रुग्णांवर अंकुश बसला. फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंतही कोरोनाची नव्या रुग्णांची संख्या ५० च्या आत होती. याचा पॉझिटिव्हिटी रेट सरासरी ५ टक्के असायचा; परंतु मार्च महिन्यात रुग्णसंख्या दररोज १०० पेक्षा जास्त वाढू लागली. १० मार्चपासून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात असल्याने चाचण्यांची संख्या दोन हजारांच्यावर गेली. त्यामुळे नव्या बाधित रुग्णांची संख्याही २०० पेक्षा जास्त होऊ लागली. याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करून कोरोनाला दूर ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कोट

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिकांना आवाहन करूनही गाफील राहत असल्याचे दिसते. फेब्रुवारी महिन्यात सरासरी पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के होता. आता तो वाढून १० झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना नियमांचे पालन करावे.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

अशी आहे आकडेवारी

मार्च

तारीखचाचणीबाधित

८ ८५५ ८९

९ ७९० ९३

१० १०६३ ११०

११ १४०७ १८५

१२ १७१७ १६३

१३ १६९१ १८१

१४ २६४१ २६०

१५ २४८३ २४८

एकूण १२६४७ १३२९

---

फेब्रुवारी

तारीखचाचणीबाधित

८ ३७५ २०

९ ५८६ २४

१० ४८२ १९

११ ४२९ १६

१२ ४७३ ३०

१३ ४४७ २६

१४ २५६ १६

१५ ३१५ १९

एकूण ३३६३ १७०

Web Title: Be careful, double the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.