सावधान! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:22+5:302021-09-19T04:35:22+5:30
बीड: सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ऑफर्सची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र, याचा फायदा उचलत सायबर भामटे तुम्हाला लुटण्यासाठी टपून बसलेले ...
बीड: सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ऑफर्सची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र, याचा फायदा उचलत सायबर भामटे तुम्हाला लुटण्यासाठी टपून बसलेले आहेत. त्यामुळे फेस्टिव्हल ऑफर्सशी कुठलीही लिंक क्लिक करताना काळजी घ्यावी लागेल अन्यथा आर्थिक फटका बसण्याचा धोका सायबर विभागाने वर्तवला आहे.
सणोत्सव आले की कमी किमतीत वस्तू देण्याचे शिवाय त्यावर आकर्षक बक्षीस देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यावर विश्वास ठेवून अनेकजण खरेदी करतात, पण ही खरेदी खात्रीच्या वेबसाईटवरून केली आहे याची कोणी तपासणी करत नाही व पैसे पाठविल्यानंतर लिंक गायब होते.
....
अशी होऊ शकते फसवणूक
१) ऑफर्सचे शेवटचे काही दिवस किंवा तास उरले आहेत. तेव्हा तत्काळ फायदा घ्या, असे संदेश मोबाइलवर प्राप्त होतात. त्याला अनेक जण भुलतात. कोणतीही खात्री न करता दिलेल्या लिंकवर क्लिक केले की त्याच वेळी खात्यातून पैसे गायब होतात.
....
२) फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून त्यावर सावज जाळ्यात अडकवले जाते. खात्री न करता एकदा का लिंक क्लिक केली की मग तुम्ही आमचे बेस्ट ग्राहक आहात, कंपनीने तुमची निवड केली आहे, असे सांगून गंडा घातला जातो.
....
ही घ्या काळजी...
ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा. आवडलेली वस्तू ऑर्डर करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उत्तम. एखादी वस्तू आवडल्यास विश्वासार्ह ॲपवरून खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी साईटची खात्री करा. साईटला रेटिंग किती आहेत, हे अवश्य तपासा, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी केले आहे.
....
ऑनलाइन फसवणूक
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
....