१ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:57+5:302021-05-23T04:33:57+5:30
बीड : गतवर्षीचा पीकविमा मिळण्यासाठी शासन दरबारी, तसेच इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार खेटे मारूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला ...
बीड : गतवर्षीचा पीकविमा मिळण्यासाठी शासन दरबारी, तसेच इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार खेटे मारूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. यामुळे १ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसमोर महिला शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करणार आहेत.
शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी जिल्हाधिकारी व विमा कंपनीला ई-मेलद्वारे याबाबत निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. विमा मिळत नसल्याने शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या मुंबई येथील शेतकी कार्यालयात जाऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा द्यावा, अशी मागणी महाप्रबंधकांकडे ई- मेलद्वारे केली होती. वारंवार आंदोलन करूनही जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा या मागणीसाठी कोरोनाचे नियम पाळून १ जून रोजी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसमोर एक महिला शेतकरी आंदोलन केले जाणार आहे, तर भाई थावरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.