ऊस तोडणी कामगारांच्या हित रक्षणासाठी सज्ज रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:41+5:302021-01-03T04:33:41+5:30
महाराष्ट्र वाहतूक कामगार संघटनेच्या नेतृत्वामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या दरवाढीसाठी संघटनेने संप पुकारला होता. हे संप आंदोलन यशस्वी केल्यानंतर डॉ. ...
महाराष्ट्र वाहतूक कामगार संघटनेच्या नेतृत्वामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या दरवाढीसाठी संघटनेने संप पुकारला होता.
हे संप आंदोलन यशस्वी केल्यानंतर डॉ. कराड यांचा हा बीड जिल्ह्यातील पहिलाच दौरा होता. त्यानिमित्ताने परिसरातील कार्यकर्ते, मुकादम, वाहनमालक ऊस तोडणी कामगारांनी डॉ. कराड यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, सध्याचे केंद्र सरकार कामगार वर्ग विरोधी भूमिका घेत आहे. कामगार कायद्यांमधील कामगारविरोधी बदल चालू असताना सिटू संघटना देशभर संघर्ष करत आहे. ऊस तोडणी कामगारांचे अधिकार व हित जपण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व संघटना मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
संपाच्या बोलणीमध्ये ऊस तोडणी मजुरांच्या बाजूने कॉ.कराड यांनी खंबीर भूमिका घेतल्यामुळे त्यांचे ऊसतोडणी कामगारांनी स्वागत केले व आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र ऊस तोडणी कामगार संघटनेचे कॉ विजय राठोड, कॉ अशोक राठोड, कॉ बळीराम भुंबे, सचिन चव्हाण, बंडू गरड, विनायक राठोड, अनील राठोड, रवि जाधव, सुभाष राठोड, गणेश राठोड, बाबूराव जाधव, रोहिदास राठोड व मुकादम आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.