बीडमध्ये बारावीचे कॉलेजकुमार बनले दरोडेखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:34 AM2017-11-29T00:34:08+5:302017-11-29T00:38:18+5:30

राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यावेळी थांबलेल्या वाहनांवर ‘अटॅक’ करीत चालकांना, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लाखो रूपये लुटणा-या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व आरोपी अल्पवयीन असून बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. चित्रपटाला लाजवेल असा सापळा लावून बीड पोलिसांनी ‘लाईव्ह’ कारवाई केली.

 Bead became a college student in Baramati | बीडमध्ये बारावीचे कॉलेजकुमार बनले दरोडेखोर

बीडमध्ये बारावीचे कॉलेजकुमार बनले दरोडेखोर

Next
ठळक मुद्देवाटमारी करणा-या टोळीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक, गेवराई पोलिसांची संयुक्त कारवाई

बीड : राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यावेळी थांबलेल्या वाहनांवर ‘अटॅक’ करीत चालकांना, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लाखो रूपये लुटणा-या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व आरोपी अल्पवयीन असून बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. चित्रपटाला लाजवेल असा सापळा लावून बीड पोलिसांनी ‘लाईव्ह’ कारवाई केली.

बाबूराव काटकरसह इतर तिघे अल्पवयीन मित्र आहेत. चौघेही गेवराई तालुक्यातीलच रहिवासी आहेत. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ते गेवराईत एकत्र आले. एकत्रच क्लास लावले. येथे त्यांची घट्ट मैत्री झाली. काही दिवस अभ्यास केला. परंतु एका अल्पवयीन आरोपीच्या डोक्यात वाटमारीची संकल्पना आली. एकट्याला हे शक्य नसल्याने त्याने इतरांची मदत घेतली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी खºया ‘अभ्यासाला’ सुरूवात केली.

गेवराई तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी काही वाहनधारक रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून आराम करतात. हीच संधी साधून हे चौघे लोखंडी टॉमी व इतर हत्यारांचा धाक दाखवून या वाहनधारकांना मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करीत होते. एका पाठोपाठ एक वाटमा-या होत असल्याने वाहनधारकांत दहशत निर्माण झाली होती.तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

पोलिसांनी सुरूवातीला रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. परंतु यामध्ये त्यांना कोणावरच संशय आला नाही. हे कोणी तरी नवीन असावेत, असा अंदाज त्यांचा होता. त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावला आणि यामध्ये गुन्हेगार अडकले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अर्जून भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, दरोडाचे सपोनि श्रीकांत उबाळे, दिलीप तेजनकर, रवी सानप, सचिन पुंडगे, फौजदार रामकृष्ण सागडे, मालुसरे, पवार, अंकुश वरपे, मिलींद शिंदे, रेवणनाथ गंगावणेसह एलएसीबी, एडीएस आदींनी केली.

तीन दिवस लावला होता  सापळा
बीड पोलीस मागील तीन दिवसांपासून या लुटारूंच्या मागावर होते. वेगवेगळी ‘डमी’ वाहने उभा करून त्यांनी त्यात पोलीस कर्मचारी ठेवले. दोन दिवस त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही. सोमवारी रात्री नागझरीजवळ तीन कर्मचारी झोपवून टेम्पो रस्त्यात लावला. रात्री दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दरवाजा उघडून पैशांची मागणी केली. याचवेळी आतील एका कर्मचा-याने त्याला पकडले. एवढ्यात पाठीमागे झोपलेल्या दोन जवानांनी त्याच्यावर झडप घातली. टेम्पोसमोर दुचाकीवर असणाºया दोघांना पोलीस असल्याचा संशय येताच त्यांनी दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत बाजूच्या उसातून पळ काढला.

पालकांच्या विश्वासाला तडा
आई-वडिलांकडून आपल्या पाल्याला मोठ्या अपेक्षा असतात. आपला पाल्य चांगला अधिकारी, व्यावसायिक अथवा प्रतिष्ठित व्यक्ती बनावा, अशी अपेक्षा सर्वांनाच असते. त्यासाठी ते जिवाचे रान करून, पोटाला चिमटा घेत पाल्याला शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी टाकतात. तिथे महागडे ‘क्लासेस’ लावले जातात. यासाठी हजारोंचा खर्च केला जातो. परंतु मुले याचा गैरफायदा कसा घेतात? याचे ज्वलंत उदाहरण या कारवाईने समोर आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आठवड्यातच तीन जिल्ह्यात धुमाकूळ
या टोळीने बीडसह अहमनगर, जालना जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. दिवसा झोपायचे आणि रात्री वाटमारी करायची, असे त्यांचे नियोजन होते. आठवड्यापूर्वीच त्यांनी गुन्हे करण्यास सुरूवात केली होती. तब्बल १० गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केले आहे. वास्तवात केवळ तीनच गुन्ह्यांची नोंद आहे.

अनुभव कामाला
एलसीबीचे तत्कालीन व आताचे गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, विद्यमान पोनि घनश्याम पाळवदे यांचा अनुभव या कारवाईत कामाला आला. त्यामुळे या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

श्रीधर, कलुबर्मेंकडून आढावा
शिवाजीनगर व धारूर ठाण्यातून आरोपीचे पलायण, यामुळे बीड पोलीस चर्चेत होते. अशातच वाटमाºया होत असल्याने पोलिसांना तपासाचे आव्हान होते. परंतु पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या चमूला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्याने या टोळीचा पर्दाफाश करण्यात लवकर यश आले. तासातासाला या अधिकाºयांकडून आढावा घेतला जात होता.

 

Web Title:  Bead became a college student in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.