बीड शहर अंधारात; आता कचराही दिसेल जागेवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:59 PM2019-04-11T23:59:34+5:302019-04-12T00:01:32+5:30
बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची ...
बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यूत विभागाच्या कर्मचाºयांनी दहा दिवसांपासून काम बंद केल्याने पथदिवे बंद असल्याने शहर अंधारात आहे. आता स्वच्छता विभागाचे कर्मचारीही काम बंद करण्याच्या पावित्र्यात असल्याने शहरातील कचरा जागेवरच दिसणार आहे. पालिकेचा हा गलथान कारभार आता सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याने पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड पालिकेतील कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. पालिकेत कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही. आओ जाओ घर तुम्हारा, अशी काहीसी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. उपजिल्हाधिकारी मिलींद सावंत यांच्याकडे पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे पालिकेबद्दल विचारणा केल्यावर, आपण निवडणूकीच्या कामात असल्याचे सांगून ते दुर्लक्ष करतात.
त्यांना पालिका आणि शहराची कसलीच काळजी नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. सावंत यांच्या कामकाजाबद्दल आता सर्वसामान्य आणि पालिका कामगार, कर्मचाºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज शहर घाणीच्या साम्राज्यात आणि अंधारात आहे. त्यांनी लक्ष न दिल्यामुळेच आज कामगार, कर्मंचाºयांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करून वेतन अदा करावे, आणि बीडकरांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, मागील दोन महिने पालिकेने बील थकविल्याने शहरातील पथदिवे बंद होते. तर आता विद्यूत विभागाच्या १२ कर्मचाºयांचे वेतन थकल्याने त्यांनी पथदिवे चालू, बंद करणे सोडले आहे. त्यामुळे १० दिवसांपासून शहर अंधारात आहे. तर दुसºया बाजूला स्वच्छता विभागातील १७ घंटागाडी चालकांचेही वेतन मिळाले नाही.
वारंवार मागणी करूनही त्यांना टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे ते सुद्धा आता काम बंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यासह पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांचेही वेतन थकल्याने संताप व्यक्त होत आहे.
या सर्वांचे वेतन तात्काळ अदा करून त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ थांबवावी, अशी मागणी मनविसेचे शैलेष जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, विद्युत विभागाच्या अभियंता कोमल गावंडे यांची भेट न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही. त्यांच्या कर्मचाºयाला विचारणा केली असता, आपण याबद्दल काही बोलू शकत नाही, मॅडमलाच विचारुन घ्या, असे सांगितले. गावंडे यांचा भ्रमणध्वनी नसल्याने उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स्वच्छता विभागाचे प्रमुख व्ही. टी. तिडके म्हणाले, हा विषय तात्काळ मार्गी लावला जाईल.
कामगार, कर्मचाºयांवर दबाव
वेतन थकले तरी काम करीत रहा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हणत काही अधिकारी कामगार, कर्मचाºयांवर दबाव आणत आहेत. मात्र काहीजण आता आक्रमक झाले असून कामबंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. वेतन थकल्याने आम्ही कुटूंब कसे चालवायचे, महामानवांची जयंती कशी साजरा करायची? असा सवालही काही कर्मचाºयांनी अधिकाºयांना उपस्थित केला आहे. असे असले तरी अधिकाºयांनी मात्र या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.