बीडमध्ये १३ बॅँकांचे ८०० अधिकारी, कर्मचारी संपावर; १४०० कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:03 AM2018-12-27T00:03:01+5:302018-12-27T00:03:47+5:30
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते.
देना, विजया आणि बडोदा बँकेचे विलीनीकरण आणि वाढत्या एनपीएच्या विरोधात सकाळी येथील जालना रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने करण्यात आली. त्या प्रसंगी सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील विविध पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरकारच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.
विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी केलेला हा संप अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी एसबीआयएसयूचे डीजीएस माधव जोशी, आरएस. वैभव ढोले, एसबीआय अधिकारी संघटनेचे जिल्हा प्रमुख विजय चव्हाण, बीओएइयूचे जिल्हा प्रतिनिधी विपीन गिरी, अश्विनी बांगर यांनी भाषणे केली. सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली.