बीडमध्ये स्कूल रिक्षाचालकांचा आडमुठेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:14 AM2017-12-13T01:14:43+5:302017-12-13T01:15:18+5:30
क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाºया स्कूल रिक्षांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी गेले. एक दोन रिक्षा पकडल्यानंतर ही माहिती वाºयासारखी पसरली आणि इतर रिक्षावाचालकांनी मुलांना रस्त्यात सोडूनच पळ काढला. दुपारनंतर त्यांनी संप पुकारला. यामुळे मुलांचे मोठे हाल झाले. नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाºया या रिक्षाचालकांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे.
मागील काही दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात शाळकरी मुलांची रिक्षांतून क्षमतेपेक्षा अधिक बसवून वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. असे असतानाही आरटीओ व शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी एक दिवस कारवाई करून वाहतूक शाखेने दंड वसूल केला होता.
त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती. मंगळवारी पुन्हा कारवाईची मोहिम हाती घेतली. एक-दोन रिक्षा पकडल्यानंतर सर्वांनी एकमेकांना फोनाफोनी करून कारवाईची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनीच मुलांना सोडून पळ काढला. यामुळे मुलांचे हाल झाले. पालकांनीच आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याबरोबरच जाऊन आणले. दरम्यान, नियमांचे पालन करणा-या रिक्षा चालकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
जे नियमांचे उल्लंघण करून मुलांची वाहतूक करतात, त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर योग्य असेही संघटनेने कळविले आहे. सर्व स्कूल रिक्षांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, अशी मागणी आहे.
- रिक्षा संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा
मंगळवारी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर जिनियस स्कूल आॅटो युनियनतर्फे शाळेच्या रिक्षांचा बेमुदत संप पुकारल्याचे पत्रक काढले.
जिल्हाधिका-यांना भेटून १४ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यामध्ये कळविले आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बाबूभाई आतार, उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, सचिव अशोक शेटे यांनी केले आहे.