बीडकरांना मिळणार चार दिवसांआड पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:20 AM2018-01-16T00:20:16+5:302018-01-16T00:21:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून पालिकेने अभ्यास केला आहे. एका महिन्यात तब्बल २६५ लिकेज दुरुस्ती करुन पाणी अपव्यय थांबविण्याबरोबरच बीडकरांना चार दिवसाआड पाणी देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होणार असल्याचे पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पालिकेचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल? हे वेळच ठरवेल.
यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव व बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरण तुंडूंब भरले. एवढे पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी बीडकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. मुख्य जलवाहिनीसह शहरातील अंतर्र्गत जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज आहेत. यामुळे पाणी कमी दाबाने येण्याबरोबरच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.
सध्या बीड शहरात हद्दवाढ भागात वेळेवर पाणी येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. तसेच शहरातही आठ ते दहा दिवसाला पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढत्या तक्रारी पाहून पालिकेने अभ्यास करून मुख्य कारणे शोधली. यामध्ये माजलगाव ते बीड, बिंदुसरा धरण ते बीड अशा मुख्य जलवाहिनीला तब्बल ४०० वर लिकेज असल्याचे समोर आले.
या लिकेजमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी बैठक घेतली आणि लिकेज दुरूस्तीचे काम हाती घेतले. गतीने काम केल्यामुळे केवळ एका महिन्यात १५ मोठ्या लिकेजसह २६५ छोटे लिकेज दुरूस्त करण्यात आले. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबला आहे.
हेच पाणी आता नागरिकांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतिष दंडे, राहुल टाळके, निखील नवले, पी.आर.दुधाळ आदींनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाच पर्यवेक्षकांची नियुक्ती
यापूर्वी पालिकेत दहा सुपरवायझर होते. एवढे लोक असतानाही केवळ समन्वय आणि संवाद नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परंतु आता यापैकी केवळ पाचच जण ठेवण्यात येणार असून त्यांच्याकडून पूर्ण नियोजन करून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीडकरांना यावर्षी तरी सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे.