बीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:41 AM2018-04-21T00:41:33+5:302018-04-21T00:41:33+5:30

Beading in Beed; No tharila thaara .... | बीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....

बीडमध्ये नाफेडचा असाही तोरा; तुरीला नाही थारा....

Next
ठळक मुद्देतूर खरेदी बंद ; तीन दिवसांपासून केंद्रावर शेतकरी ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नाफेडने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही.
मागील ७७ दिवसात बीड केंद्रावर १६ हजार ५७८ क्विंटल तूर खरेदी झाली. तर अद्याप आणखी शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रांवर तूर घेऊन आलेले शेतकरी तीन दिवसांपासून त्यांची तूर कधी घेतली जाईल याची वाट पाहत होते. गुरुवारी बीड केंद्रावर शेतकºयांची गेटबाहेर व आत ४५ वाहने उभी होती. गेवराई केंद्रावरही ४० ते ५० वाहने उभी असल्याचे सुत्रांनी सांगितले. आष्टी येथील केंद्रावरही २०- २५ वाहने उभी होती. जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही तूर घेऊन आलेले शेतकरी ताटकळले होते. तूर खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

तूर बंद मात्र हरभरा खरेदी
नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदी बंद करण्यात आली असलीतरी हरभरा खरेदी मात्र सुरु आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. १ मार्चपासून १८ एप्रिलपर्यंत १३५४ शेतकºयांच्या १५ हजार ६८० क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली. या पैकी ४४७० क्विंटल हरभरा वखारच्या गोदामात साठविण्यात आला असून ११ हजार २१० क्विंटल हरभरा गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्रावर पडून आहे. कडा येथील केंद्रावर १९३३ क्विंटल, अंबाजोगाई केंद्रावर ७हजार ५४५ क्विंटल, आष्टी केंद्रावर ६ हजार १९३ तर शिरुर केंद्रावर ९ क्विंटल हरभरा खरेदी झाला. हा ओघ कमीच आहे.
नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर घ्या
राज्य सरकार कडून दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात तूर खरेदी सुरु केली होती. तसेच नाफेडच्या वतीने माजलगाव बाजार समितीअंतर्गत २१ मार्चपासून खरेदीची परवानगी दिली. त्यामुळे शेतकºयांनी आॅनलाईन नोंद केलेली आहे परंतू अनेक शेतकºयांना आॅनलाईन मेसेजच मिळाले नाही. तसेच १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने नोंदणी केलेले शेतकरी मापापासून वंचित राहिले आहेत. त्यांची तूर खरेदीसाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी शासन व नाफेडकडे केली आहे.

Web Title: Beading in Beed; No tharila thaara ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.