बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा म्हणत निबंधकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:44+5:302021-03-20T04:32:44+5:30

माजलगाव : येथील रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शुक्रवारी या दलालांनी ...

Beat the registrar saying cultivate the horticulture registry | बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा म्हणत निबंधकाला मारहाण

बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा म्हणत निबंधकाला मारहाण

Next

माजलगाव : येथील रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शुक्रवारी या दलालांनी बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करावी यासाठी येथील निबंधकांवर दबाव टाकून मारहाण केल्याची घटना घडली.

येथील रजिस्ट्री कार्यालयाला दलालांनी चांगलेच वेढले आहे. हे दलाल बोगस कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांशी संगनमत करून रजिस्ट्री करून घेत असल्याचे प्रकार सर्रास या ठिकाणी केले जात असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक दलाल एका ग्राहकाची रजिस्ट्री करण्यासाठी आला. रजिस्ट्रीची कागदपत्रे निबंधकांच्या हातात दिली. त्यानंतर ही कागदपत्रे निबंधक पी.एम. राठोड तपासत असताना या कागदपत्रांमध्ये ही जागा बागायतीमध्ये येत असताना ही रजिस्ट्री जिरायतीत दाखविण्यात आली. यामुळे निबंधकांनी हे बागायती क्षेत्र असल्याने जिरायतीची रजिस्ट्री होऊ शकणार नाही असे सांगितले. त्यावर संबंधित दलाल व निबंधकांमध्ये वाद निर्माण होऊन एकमेकांना धराधरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हा वाद जवळपास दोन तास सुरू राहिल्याने रजिस्ट्री करण्यासाठी आलेले अनेक नागरिक ताटकळले. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या ठिकाणी भांडण सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर पोलीस अर्ध्या तासांनंतर या ठिकाणी हजर झाले. तरीही हा वाद सुरूच होता.

याबाबत येथील निबंधक पी.एम. राठोड यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, अनेक जण कोणतीही कागदपत्रे आणून व बागायती क्षेत्र असताना जिरायती क्षेत्र दाखवीत रजिस्ट्री करण्यासाठी दबाव टाकतात. यातूनच आजचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले, तर मला कसल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे ते म्हणाले.

आर्थिक व्यवहारातून झाला वाद

या ठिकाणी बोगस कागदपत्रे तयार करून व बागायती क्षेत्र असताना जिरायती दाखवून संबंधित अधिकारी व दलाल शासनाला चुना लावत असल्याची चर्चा या ठिकाणी होती. शुक्रवारी निबंधक व दलालात आर्थिक

व्यवहार पूर्ण न झाल्याने निबंधकांनी या रजिस्ट्रीत अनेक त्रुटी काढल्या. यामुळे हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

गुन्हा दाखल नाही

निबंधकांना त्यांच्या कार्यालयात मारहाण झाली असताना व याचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानादेखील संबंधित लोकांवर गुन्हा दाखल का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण त्या लोकांची तक्रार दिल्यास आपलेच कारनामे उघड होतील या भीतीने निबंधक पी.एम.राठोड यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत होती.

===Photopath===

190321\purusttam karva_img-20210319-wa0021_14.jpg

Web Title: Beat the registrar saying cultivate the horticulture registry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.