खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विधवा महिलेस मारहाण ; केज पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:19+5:302021-07-28T04:35:19+5:30
केज तालुक्यातील एका २३ वर्षीय विधवा महिलेचे साळेगाव येथील एका व्यक्ती सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे प्रेमीयुगलाने ...
केज तालुक्यातील एका २३ वर्षीय विधवा महिलेचे साळेगाव येथील एका व्यक्ती सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे प्रेमीयुगलाने धूम ठोकली होती. मात्र दुसऱ्या जातीतील व्यक्ती सोबत या महिलेचे प्रेम समाजास मान्य नव्हते. दरम्यान प्रियकरासोबत पळून गेलेली महिला परत गावी आल्यानंतर तिला २४ जुलै रोजी सासू, सासरे, दीर व जाऊ यांनी बळजबरीने व बळाचा वापर तिला घरी घेऊन गेले व तिला प्रियकराविरुद्ध पोलिसात अत्याचाराची खोटी तक्रार दाखल कर म्हणून सासू ,सासरा ,दीर आदी चौघांनी लाकडी काठी, बेल्ट व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. खोटी पोलीस केस केली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी विधवा महिलेने केज पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराविरुद्ध अत्याचाराची खोटी तक्रार दाखल कर म्हणून मारहाण करणाऱ्या सासू,सासरा, दीर, जाऊ,या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने चौघांविरुद्ध गु.र.नं. ३६९/२०२१ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार महादेव गुजर हे करीत आहेत.