बीडमध्ये ११२६९ शेतकरी पात्र तरीही शेततळ््यांचे उद्दिष्ट अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:21 PM2018-03-13T23:21:02+5:302018-03-13T23:21:10+5:30
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळे जिल्ह्यात होणे आवश्यक होते. मात्र हे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. जिल्ह्यातील दुष्काळ निवारण व्हावे व शेतीला मुबलक पाणी मिळून रबी आणि खरीप हंगामातील दोन्ही पिके शेतक-यांना घेता यावीत, हा योजनेचा हेतू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
मात्र त्यापैकी फक्त ४१०५ शेतकरी या योजनेचे लाभार्थी झाले. तसेच ३५५ शेततळ््याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४४६० शेततळे झाल्याचे चित्र आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोण कमी पडले हा प्रश्न आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी ही योजना उपयोगी आहे. मात्र यासाठी प्रशासनाने आणि शेतक-यांनी योग्य तो पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शेततळ्याविषयी जनजागृती शासनाकडून केली जाते. तरी देखील जिल्ह्यात शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन प्रणाली वापरावी लागते. त्यामुळे याचा पाठपुरावा शेतकºयांनी वेळो-वेळी केला नाही तर त्यांचे नाव या योजनेमधून वगळण्यात येते हेही एक कारण या योजनेची उद्दिष्टपूर्ती न होण्याचे आहे.
शेतकरी प्रशासनात योजनेविषयी उदासीनता
मागेल त्याला शेततळे योजनेबाबत पुरेशी व समर्पक माहिती देण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी, अधिकारी एकतर उपलब्ध होत नाहीत. तर भेट झाल्यास शेत-यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. कागदपत्रातील किरकोळ त्रुटी काढून प्रस्ताव नाकारले जातात. दलालामार्फत शेततळ्याचे काम तत्परतेने होते. शेतकºयांना गावातील सरपंच ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतक-यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तसेच शेततळे घेण्यासाठी शेतक-यांनी वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक.
जिल्ह्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी व दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी जिल्ह्यात अशा योजना १०० टक्के राबवणे आवश्यक आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजना उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची बारमाही पाणी उपलब्धतेमुळे शेतीमध्ये नवे प्रयोग करता येतील