बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:43 AM2018-03-31T00:43:22+5:302018-03-31T00:43:22+5:30

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे.

In Beed, 1139 candidates filed their written examination for recruitment | बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा

बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा

Next
ठळक मुद्दे२९ हॉलमध्ये तगडा बंदोबस्त; हॉलमध्ये कॅमेऱ्यांसह अधिकारी, चार कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे.

मागील महिनाभरापासून जिल्हा पोलीस दल भरती प्रक्रियेत व्यस्त होते. ५३ जागांसाठी १२ ते २१ मार्च दरम्यान मैदानी चाचणी झाली. यात ४ हजार उमेदवार पात्र ठरले. पैकी ११६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांची शुक्रवारी बीडमध्ये आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान एकाच वेळी परीक्षा घेण्यात आली. ११६६ पैकी २७ उमेदवार गैरहजर होते. एकूण २९ हॉलमध्ये प्रत्येकी ४० उमेदवार बसविण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक हॉलमध्ये एक अधिकारी, चार कर्मचारी तसेच एक कॅमेरामन नियुक्त केला होता. परिक्षेदरम्यान वॉकी-टॉकीवरुन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर प्रत्येक अधिकाºयाला घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना करीत होते. तगड्या बंदोबस्तात परीक्षा सुरळीत पार पडली. केंद्राच्या बाहेरही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तगडा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उप अधीक्षक भाग्यश्री नवटके, डॉ. अभिजित पाटील, सुधीर खिरडकर, विशाल आनंद, अर्जुन भोसले, मंदार नाईक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे सह इतर अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते.

अर्धा तास अगोदरच उमेदवार हॉलमध्ये
ऐनवेळी धावपळ, गडबड गोंधळ होऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना सकाळी ७ वाजताच केंद्रस्थळी बोलाविले होते. शांततेत चौकशी व तपासणी करुन त्यांना हॉलमध्ये सोडण्यात आले. अर्धातास अगोदरच ते हॉलमध्ये बसले. धावपळीने त्रास झाल्यामुळे उमेदवार थोडा वेळ शांत बसले. बायोमॅट्रीकद्वारे त्याची हजेरी घेण्यात आली. सकाळी ९ वाजता उमेदवारांच्या हाती प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आली.

अडीच वाजता मिळाली अ‍ॅन्सर की
परीक्षा संपल्यानंतर चार तासांनी दुपारी २.३० वाजता अ‍ॅन्सर की उमेदवारांना पाहवयास मिळाली. बीड पोलीस या संकेतस्थळासह पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालयावर या अ‍ॅन्सर की प्रसिद्ध करण्यात आल्या.

Web Title: In Beed, 1139 candidates filed their written examination for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.