बीड : क्रेनने उभा केला ५० फुटी रावण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:53 PM2018-10-17T23:53:37+5:302018-10-17T23:54:43+5:30

येथील ग्रामदेवता खंडेश्वरी शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतिषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षीही रावणाची ५० फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Beed: 50 feet of Ravana raised by crane | बीड : क्रेनने उभा केला ५० फुटी रावण

बीड : क्रेनने उभा केला ५० फुटी रावण

Next
ठळक मुद्देखंडेश्वरी यात्रा : आज रात्री होणार दहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील ग्रामदेवता खंडेश्वरी शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतिषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षीही रावणाची ५० फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बुधवारी रावण क्रेनच्या सहाय्याने उभा करण्यात आला.
विजयादशमीच्या दिवशी खंडेश्वरी देवी यात्रेत रावण दहनाचा कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून मोठे आकर्षण ठरला आहे. सीमोल्लंघनानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते. रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रणजितसिंह चौहान, सचिव बापुराव चौरे, राजेंद्र बनसोडे तसेच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण शेणकुडे, जयंत राऊत, विश्वांभर तपासे, सचिन घोडके यांच्यासह तरूण मंडळींनी दहा दिवसांपासून परिश्रम घेतले. खंडेश्वरी नवरात्र उत्सवात नवचंडी यागाची बुधवारी सांगता झाली. महादेव देशमाने, शैलेश भुतडा हे यजमान होते. होमहवन, पूजन, पुर्णाहुती व आरतीनंतर उपवासाची सांगता झाली. गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. पहाटे विजयादशमीची महापूजा विजय बाबुलाल तिवारी यांच्या हस्ते होईल.
रावण दहनात आतषबाजी
४रावण दहन फटाक्यांच्या आतशबाजीमुळे आकर्षण ठरलेले आहे. यंदा आकाशात विविध रंग उधळणाऱ्या ५०० आवाजाच्या (शॉट) मिनी तोफा, शिटी मारणे, तसेच क्रॅकिंग फटाके, ब्ल्यू स्मोकर या आदी शिवाकाशीच्या आधुनिक फटाक्यांबरोबरच तेरखेड्याच्या पारंपरिक फटाक्यांमुळे हा कार्यक्रम मनोरंजक व आकर्षक ठरणार आहे.

Web Title: Beed: 50 feet of Ravana raised by crane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.