Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:56 AM2022-03-06T09:56:05+5:302022-03-06T09:56:15+5:30

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसीलदार आणि इतर अधिकारी कर्तव्यावर असताना गाडीचा अपघात झाला.

Beed Accident | Board officer died on the spot and Tehsildar injured in car accident in Gevrai | Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

googlenewsNext

गेवराई:बीडमध्ये चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर बीडचेतहसीलदार आणि एक कर्मचारी जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेलतला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, नितीन जाधव(वय39) आणि अन्य एक कर्मचारी रविवारी तालुक्यातील वाळू पट्यात पाहणी करण्यासाठी आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास गेवराईकडे परत येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्ताच्या बाजुला असलेल्या खड्यात पडली. 

राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळ हा अपघात झाला. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव(वय 39 रा.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार सुरेंद्र डोके व अन्य एक कर्मचारी जखमी झाले. सध्या डोके यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed Accident | Board officer died on the spot and Tehsildar injured in car accident in Gevrai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.