सुसाट कारचालकाने दोन पोलिसांना उडविले; अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 08:36 IST2024-07-08T08:36:39+5:302024-07-08T08:36:51+5:30
बीडमध्ये रस्ते अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

सुसाट कारचालकाने दोन पोलिसांना उडविले; अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार
नेकनूर (जि. बीड) : पोलिस भरतीप्रक्रियेसाठी निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या दुचाकीला सुसाट कारने धडक दिल्याने दिंद्रड ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर नन्नवरे ठार, तर सोबतचे सिरसाळा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे जखमी झाले. नेकनूरपासून दोन किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
नन्नवरे व नागरगोजे या दोघांना बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते. दोघेही सकाळी बीडकडे दुचाकीने निघाले होते. कारची धडक एवढी भयंकर होती की नन्नवरे यांचा उजवा पाय अक्षरश: तुटून बाजूला पडला व नागरगोजे यांनाही पायाला तसेच अंगाला जबर मार लागला. नागरगोजे यांच्यावर उपचार सुरू आहेत.