बीडमध्ये बिंदुसरा नदीवरील धोकादायक पुलास केलेला पर्यायी रस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:50 PM2017-08-28T14:50:52+5:302017-08-28T14:51:11+5:30
धुळे -सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ( एनएच-211) बीड शहरातून जातो. याच महामार्गावर शहरातील बिंदुसरा नदीवर बार्शी नाका येथे ब्रिटीशकालीन पूल आहे. काही दिवसांपूर्वी हा पूल धोकादायक बनल्याने यास पर्यायी रस्ता करण्यात आला होता. रविवारी( दि. 27) झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता रात्रीतून वाहून गेला.
बीड, दि. 28 : धुळे -सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ( एनएच-211) बीड शहरातून जातो. याच महामार्गावर शहरातील बिंदुसरा नदीवर बार्शी नाका येथे ब्रिटीशकालीन पूल आहे. काही दिवसांपूर्वी हा पूल धोकादायक बनल्याने यास पर्यायी रस्ता करण्यात आला होता. रविवारी( दि. 27) झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता रात्रीतून वाहून गेला. यामुळे दोन्ही बाजूकडे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील बिंदुसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली. वाहतुकीसाठी पुलाखालीच भराव टाकून एक पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. दरम्यान, रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता वाहून गेला. या पावसाळ्यात हा पर्यायी रस्ता वाहून जाण्याची हि दुसरी वेळ आहे. या महामार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहूतक असल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुस-या मार्गाने वळविण्यात आली आहे.