बीड शहर एलइडी दिव्यांनी उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:22 AM2018-10-07T00:22:56+5:302018-10-07T00:24:18+5:30
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
नगर पालिकेच्या विद्यूत विभागातील प्रमुख आणि ई. ई. एस. एस. कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी कंपनीच्या अधिकाºयांकडून शहरातील एनर्जी इफिसियन्सीच्या कामाची माहिती घेतली.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत बीड शहराचा समावेश झाला असून शहरात नवीन ११ हजार २१ एलईडी बल्ब बसवण्यात येणार असून या कामाला तात्काळ सुरवात करावी. नवरात्र व दसरा सण लक्षात घेऊन आवश्यक तेथे तातडीने स्ट्रीट लाईटचे काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या सुविधेमुळे आता ७ वर्षांसाठी बीडकरांना पथदिव्यांची चिंता राहणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच विद्यूत विभागासाठी दरवर्षी होणाºया ६ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्चही कमी होणार आहे. न.प.च्या स्ट्रीट लाईटसाठी स्वतंत्र लाईन बसवण्यात येणार असून सुरवातीचे ४ महिने टेस्टींगचे राहणार आहेत. त्यानंतर मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. दिल्ली येथील कंपनीशी याबाबत करार झाला असून केंद्र सरकारच्या स्कीम अंतर्गत ५० वर्षांची गॅरंटी असणारा हा प्रोग्राम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अभियंता दिपंकर बागडे, अभियंता रमेश बाब नरालागोरला, अभियंता प्रल्हाद मुंडे, तरकसे आदि यावेळी उपस्थित होते