बीड काँग्रेसच्या ६५० जणांचा रक्तदानासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:09+5:302020-12-24T04:29:09+5:30

मंगळवारी आयोजित जीवनदान महाअभियान उपक्रमातर्गंत २१ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. ...

Beed Congress initiative for blood donation of 650 people | बीड काँग्रेसच्या ६५० जणांचा रक्तदानासाठी पुढाकार

बीड काँग्रेसच्या ६५० जणांचा रक्तदानासाठी पुढाकार

Next

मंगळवारी आयोजित जीवनदान महाअभियान उपक्रमातर्गंत २१ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. जीवनदान महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाईत रक्तपेढीचे गरजेनुसार या अभियानांतर्गंत नव्याने २१ जणांनी रक्तदान केले. त्यात स्वतः काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी रक्तदान करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

मंगळवारी अंबाजोगाईत रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक सुनिल व्यवहारे, गोविंद पोतंगल, गणेश मसने, अनिस मोमीन, दिनेश घोडके, जावेद गवळी, महेबुब गवळी, सचिन जाधव, विजय रापतवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, महादेव आदमाने, राणा चव्हाण,विशाल पोटभरे, शिवय्या बसय्या हिरामण, काजी समियोद्दीन शमशोद्दीन, महेश वेदपाठक, काजी आमेर अझहर, राहुल सोळंके, शेख शरीफ शेख वलीद, राहूल वाघमारे, खंडु वाघमारे, राहुल सरवदे, नदीम शहा खलील शहा,पठाण शहारूख फिरोज खान, मोमीन अजहर मुर्तूजा,आदींसह २१ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सध्या महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणार्‍या बर्‍याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्या कडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. कोरोना विरूद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स,पोलीस, आरोग्य कर्मचारी हे आपले योगदान देत आहेत.या लढाईसाठी आवश्यक औषधे,सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Beed Congress initiative for blood donation of 650 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.