Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:21 IST2025-04-22T19:20:45+5:302025-04-22T19:21:55+5:30

मुलीच्या जखमी वडिलांवर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Beed Crime: Young man aggressive due to one-sided love, hit girl's father's car with tractor, stopped gun | Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक

Beed: एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांच्या कारला ट्रॅक्टरने दिली धडक, रोखली बंदूक

- मधुकर सिरसट
केज ( बीड) :
तुमची मुलगी मला का देत नाहीत? म्हणून मुलीच्या शिक्षक वडिलांवर ट्रॅक्टरने धडक देऊन नंतर बंदुकीच्या धाक दाखवून जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वरपगाव शिवारात आज, मंगळवारी (दि. 22 ) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी शिक्षकावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

केज तालुक्यातील वरपगाव येथील जयकिसान विद्यालयात शिक्षक असलेले बाजीराव डोईफोडे हे बीडहून आपल्या कारमधून शाळेला येणेजाणे करतात. मंगळवारी डोईफोडे हे त्यांच्याच शाळेतील गर्जे नावाच्या शिक्षकासोबत आपल्या कारने ( क्रमांक एम एच 23 / बी एच 8161) गावी परतत होते. दातम्यान, कापरेवाडी शिवारात सुरज दिलीप गुंड ( रा गुंडगल्ली, केज) याने ट्रॅक्टरने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर तुझी मुलगी मला का देत नाहीस म्हणत मारहाण केली. डोईफोडे यांना गंभीर जखमी करत गुंड तेथून पसार झाला. कारमधील दुसरे शिक्षक गर्जे यांनी डोईफोडे यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पोलीस बीडला रवाना
या प्रकरणी जखमी झालेले शिक्षक बसजीराव डोईफोडे यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व सहकऱ्यांना जवाब घेण्यासाठी बीडला पाठविले आहे. जवाब घेऊन ते केजला आल्यानंतरच केज पोलिसात अधिकृत गुन्हा नोंद होणार आसल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

एकतर्फी प्रेमातून प्रकार घडला
या प्रकरणी मुलीचे आजोबा महादेव रंगनाथ भुमरे यांनी सांगितले की, सुरज दिलीप गुंड याचे शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. यातून त्याने यापूर्वी ही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. त्यावरून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. शिक्षक कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असला तरीही गुंड हा मुलीचा पिच्छा सोडायला तयार नाही यातूनच हा प्रकार घडला आहे.

Web Title: Beed Crime: Young man aggressive due to one-sided love, hit girl's father's car with tractor, stopped gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.