बीड जिल्हा दहावीत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:59 PM2019-06-08T23:59:12+5:302019-06-09T00:00:02+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्हा औरंगाबाद विभागात अव्वल आला आहे. मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
१ ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यात ४३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. ३४ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
८ जून रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार बीड जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ८१.२३ टक्के इतका लागला आहे.
अशी आहे आकडेवारी
च्जिल्ह्यातून २४ हजार ६६३ मुले व १८ हजार २९७ मुली अशा एकुण ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार ९६२ मुले तर १५ हजार ९३४ मुली असे एकुण ३४ हजार ८९६ मुले-मुली उत्तीर्ण झाले आहेत. रिपीटरच्या परीक्षेतही जिल्ह्यातील १२२६ पैकी ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींचे उत्तीर्ण प्रमाण जास्त
च्जिल्ह्यात यंदा उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ८७.९० टक्के तर उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ७६.८८ टक्के आहे. जिल्ह्यात पाटोदा तालुक्याचा सर्वाधिक ८७.२९ तर सर्वात कमी धारुर तालुक्याचा ७१.८४टक्के लागला आहे.
पाटोदा तालुका अव्वल; धारुर सर्वात कमी
पाटोदा -८७.२९
शिरु रकासार-८६.४०
बीड-८६.२४
आष्टी-८३.८२
गेवराई-८०.१५
माजलगाव-७३.३२
अंबाजोगाई- ७८.०७
केज- ८१.२७
परळी- ७६.३४
धारु र-७१.८४
वडवणी-८०.४९
एकूण - ८१.२३