छावण्यांकडे बीड जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:30 AM2019-04-04T00:30:54+5:302019-04-04T00:32:00+5:30
जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत.
बीड : जिल्ह्यात चारा छावण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, छावण्यांचा यापुर्वीचा इतिहास लक्षात घेता निवडणुकीच्या काळात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यामुळे, छावणीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व योग्य प्रमाणात खाद्य दिले जाते का याच्या तपसणीसाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या मर्गदर्शनाखाली विविध तपाणी पथके नेमण्यात आले आहेत. मात्र, भरारी पथकाने दिलेल्या अहवालावर अजून कारवाई झालेली नसल्यामुळे प्रशासनाचे छावण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीच्या कामकाजात अनेक अधिकारी कर्मचारी व्यस्थ आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात चारा छावणी तपासणीसाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
नडे यांनी विविध छावण्यांना भेटी दिल्या व त्या ठिकाणी तापणी केली यावेळी त्यांनी तपासणी केलेल्या बहुतांश छावण्यांध्ये सरासरी २५० ते ६०० जनावरे जास्त आढळल्याची सूत्रांची माहिती आहे.
याचा अहवाल दत्तप्रसाद नडे यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे दिला आहे. मात्र अजून देखील या अहवालावर कुठलीही कारवाई झालेली नसल्यामुले चारा छावण्यांच्या अनागोंदी कारभाराला अजून चालना मिळाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी किती छावण्यांवर कारवाई करण्यात आली याची माहिती दिली नाही. ते म्हणाले यासंदर्भात पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटीचा अहवाल वरिष्टांकडे पाठवला असून कारवाई करण्याचा निर्णय ते घेतील अशी माहिती नडे यांनी दिली.
मागील महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही छावण्यांना भेट देऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चारा छावण्यांसंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसारच तपासणी पथक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून छावण्यांची तपासणी देखील योग्य पद्धतीने होत आहे. मात्र त्रुटी आढळून देखील कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
नियमांची केली जात आहे पायमल्ली
४पशुखाद्य म्हणून ऊस दिला जातो त्याचसोबत दर एक दिवसाआड पेंड देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक छावण्यांवर पेंड दिली जात नसल्याची माहिती आहे.
४त्यामुळे जर असा प्रकार तुमच्या छावण्यांवर देखील होत असेल तर त्याची तक्रार संबंधीत तहसील कार्यालयाकडे करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच बरोबर चारा छावणी सुरु करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी अनेक छावण्यांवर करण्यात आलेली नाही त्यांचवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.