प्रोत्साहन अनुदान जमा करण्यास बीड जिल्हा बँकेची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:12 PM2018-01-13T23:12:34+5:302018-01-13T23:12:56+5:30

जिल्हा बँकेच्या धारूर शाखेत चालू पीक कर्जदार शेतक-यांसाठी शासनाकडून मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे मुख्य व्यस्थापक यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला पंधरवाडा उलटूनही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. बँकांकडून यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

Beed District Bank avoids to increase the incentive grant | प्रोत्साहन अनुदान जमा करण्यास बीड जिल्हा बँकेची टाळाटाळ

प्रोत्साहन अनुदान जमा करण्यास बीड जिल्हा बँकेची टाळाटाळ

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतक-यांचा आरोप : जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाकडे बँक व्यवस्थापकांनी केले दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : जिल्हा बँकेच्या धारूर शाखेत चालू पीक कर्जदार शेतक-यांसाठी शासनाकडून मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे मुख्य व्यस्थापक यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला पंधरवाडा उलटूनही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. बँकांकडून यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ अंतर्गत चालू बाकीदार सभासदांची पीक प्रोत्साहन लाभाची १५ ते २५ हजारापर्यंतची रक्कम शासनाने जाहीर केली होती. त्यानुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टमध्ये प्रोत्साहन लाभाची रक्कम धारूर येथील शाखेला प्राप्त झाली होती. सदर रक्कम ही शेतक-यांच्या बचत खात्यात जमा करावी म्हणून आसोला, रुई धारूर, तांदळवाडी, धारूर, जहाँगीरमोहा, धुनकवाड, पांगरी, पहाडी पारगाव येथील शेतकरी व चेअरमन यांनी बँक शाखाधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हा उपनिबंधक यांना २२ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार शाखाधिकारी यांनी वरिष्ठांनी आदेश दिल्यास रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करू असे सांगितले होते.
शेतक-यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देवून सदर प्रोत्साहनपर लाभाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे लेखी आदेश २६ डिसेंबर २०१७ दिलेले आहेत. पत्र देवून पंधरवाडा उलटला तरीही अद्याप जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धारुर येथील शाखाधिकारी यांना शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले नाहीत. मात्र, शेतकरी प्रोत्साहनपर रक्कम खात्यात जमा झाली का हे पाहण्यासाठी धारुर शाखेत खेटा मारत आहेत.

२५ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा
ही रक्कम त्वरीत शेतक-यांचे बचत खात्यावर जमा करावी नसता २५ जानेवारी २०१८ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सेवा सहकारी सोसायटी धारुरचे संचालक सुधीर शिनगारे नितीन शिनगारे, रमेश चव्हाणसह इतरांनी दिला आहे.

Web Title: Beed District Bank avoids to increase the incentive grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.