बीड जिल्हा बँकेची निवडणूक सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:23+5:302021-02-26T04:47:23+5:30
राज्य सहकार प्राधिकरणाने १० फेब्रुवारी रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यापैकी अ वर्गातील बीड जिल्हा बँकेची ...
राज्य सहकार प्राधिकरणाने १० फेब्रुवारी रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यापैकी अ वर्गातील बीड जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया विधिग्राह्य नामनिर्देशपत्र सूची जाहीर करण्यापर्यंत झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही निवडणूक होत असल्याने शासनाचा स्थगिती आदेश या निवडणुकीसाठी लागू होणार नाही. त्यामुळे ही निवडणूक सुरू राहणार आहे.
बीड जिल्ह्यात अ, ब, क आणि ड वर्गातील ६३ सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणूक पूर्व कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती. तर अंबाजोगाई येथील ब वर्गातील दीनदयाल नागरी सहकारी बँक, साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था व कै. व्यंकटराव डावळे सहकारी पतसंस्था या तीन संस्थांचा मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होता. तसेच ब वर्गातील बीड येथील राजर्षी छत्रपती शाहू बँकेची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच २४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाचा निवडणूक स्थगिती आदेश धडकला.