बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:16 AM2018-07-04T01:16:44+5:302018-07-04T01:17:05+5:30

In the Beed district, the crores of millions of crores of money | बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

Next
ठळक मुद्देशुभकल्याण व परिवर्तन मल्टीस्टचे संचालक मंडळ सापडेना

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यावरून या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वरपगाव येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे. दिलीप आपेट हे त्याचे अध्यक्ष. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक करुन घेतली. त्यानंतर अध्यक्षांसह संचालक मंडळाने धूम ठोकली. ठेवीदारांनी संबंधित शाखांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शेवटी संतप्त ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून अध्यक्षासह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. आतापर्यंत बीडसह अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

यामध्ये दिलीप आपेटसह भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे या संचालकांसह शाखाधिकारी व इतर कर्मचाºयांचा आरोपींत समावेश आहे.

अशीच काहीशी परिस्थिती माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेटची आहे. भारत मरिबा अलझेंडे याने ही शाखा मल्टीस्टेट उभारली. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखा उभारून नागरिकांना जादा व्याजदराचे आमिष दाखविले. परंतु रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणुकदार मेटाकुटीस आले होते. अखेर माजलगाव येथील ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून मल्टीस्टेटविरोधात फिर्याद दिली.

त्याप्रमाणे मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत अलझेंडे, उपाध्यक्ष संजय बाबुलालजी शर्मा यांच्यासह ज्योती टाकणखार, शेख फरीदा सुलताना शेख मजहर, सुशिला अलझेंडे, शुभांगी लोखंडे, उद्धव जाधव, अर्जून होके, शहाजी शिंंदे, अनिता प्रधान, विनोदकुमार जाजू, धर्मराज भिसे, सुरेखा खडके या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात परिवर्तनविरोधात गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली.

हक्काचा अधिकारी नसल्याने अडचण
आर्थिक गुन्हे शाखेकडे सद्यस्थितीत जवळपास २२ तपास आहेत. गुन्ह्यांची संख्या पाहता आणि तपासाची किचकट प्रक्रिया पाहता येथे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यातच गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक भारत गाडे हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. काही काळ सपोनि मारूती शेळके यांनी ही शाखा सांभाळली. परंतु त्यांना याचा तपास लावण्यात अपयश आले. आता पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदेसह एक सपोनि व पोलीस उपनिरीक्षक या शाखेत नव्याने रूजू झाले आहेत. त्यांना या गुन्ह्यांचा अभ्यास करून तात्काळ तपास पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

ठेवीदारांमध्ये पोलिसांबद्दल संताप
गुन्हे दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पोलिसांकडून अद्याप समाधानकारक तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेवीदांरामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
४संचालक मंडळाला पोलीस पाठिशी घालत असल्याचा अरोपही काही ठेविदारांनी केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच अनेकवेळा ठेवीदार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटलेही आहेत. परंतु याचा काहीच फायदा झाला नसून तपास पुढे सरकलेला नाही.

संचालकांना पाठबळ
सुतावरून स्वर्ग गाठणाºया पोलिसांना अद्याप या दोन्ही मल्टीस्टेटमधील एकाही संचालकाला अटक करण्यात यश आलेले नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिकाºयांकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर असे नाही तर एवढ्या दिवस आरोपींना अटक का केली नाही, असा सवालही ठेवीदारांनी केला आहे.

Web Title: In the Beed district, the crores of millions of crores of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.