बीड जिल्ह्यात दहा महिन्यांमध्ये २७९ आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:56 AM2017-12-21T00:56:14+5:302017-12-21T00:57:15+5:30
विविध मागण्यांसाठी तब्बल २१ वेळा बीड जिल्ह्यात संप पुकारून बंद पाळण्यात आला, तर २७९ आंदोलने झाली आहेत. यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, धरणे, निदर्शने आदींचा समावेश आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध मागण्यांसाठी तब्बल २१ वेळा जिल्ह्यात संप पुकारून बंद पाळण्यात आला, तर २७९ आंदोलने झाली आहेत. यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, धरणे, निदर्शने आदींचा समावेश आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील आहे.
मागील काही वर्षांपासून प्रशासन, सरकार यांच्या विरोधात नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. चालू वर्षात भाजप सरकारच्या निषेधार्थ अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने झाली. त्यामध्ये कर्जमाफी, नोटाबंदी, जीएसटी यासारख्या मुख्य मागण्यांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर मराठा क्रांती मोर्चा, सोनार समाजाचा मोर्चा, मुस्लिम बांधवांचे मोर्चे, बहुजन समाजाचे मोेर्चे यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संताप व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक ३७, तर सर्वांत कमी फेब्रुवारी महिन्यात २२ वेळा आंदोलन झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी जिल्ह्यातील आहे. ही सर्व आंदोलने शांततेत पार पडल्याची नोंद आहे. सर्वत्र संताप व्यक्त होत असला तरी याच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो, असे सांगण्यात आले.
अशी आहे आकडेवारी
रास्ता रोको- ५९, मोर्चे- ५४, धरणे/निदर्शने- ७३, संप/बंद- २१, इतर- ६८ असे २७९ आंदोलने जिल्ह्यात झाली आहेत.