बीड जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमला आग; कागदपत्रे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:33 AM2019-05-30T00:33:01+5:302019-05-30T00:33:52+5:30

येथील जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागली. यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले.

Beed district hospital records fire; Documentation papers | बीड जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमला आग; कागदपत्रे खाक

बीड जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमला आग; कागदपत्रे खाक

googlenewsNext

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागली. यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन विभागाकडून सुरू होते.
जिल्हा रूग्णालयात अस्थापना विभागाची तीन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर स्वयंपाक घर, दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास यांचा कक्ष व सर्व अस्थापना विभाग व तिसºया मजल्यावर रेकॉर्ड रूम आहे. याच रेकॉर्ड रूमला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बाजुलाच पाठिमागे पोलीस कॉलनी आहे. येथील काही वॉक करणाºया तरूणींनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड झाली.


याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनासह अग्निशमन विभागाल देण्यात आली. त्यानंतर तात्काळ दोन बंब घटनास्थळी आले. जवानांकडून पाणी मारून उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, तहसीलदार अविनाश शिंगटे, डॉ. आय. व्ही. शिंदे, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके आदींनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत हे सर्व रूग्णालयात तळ ठोकून होते. बीड शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतरही ते घटनास्थळी पोहचले नव्हते.

Web Title: Beed district hospital records fire; Documentation papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.