१ कोटी १५ लाख देऊनही बीड जिल्हा रूग्णालय ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:07 AM2019-09-08T00:07:33+5:302019-09-08T00:08:08+5:30

जिल्हा रूग्णालयात प्रयोगशाळा व रक्तपेढी साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र द्यावे, यासाठी १ कोटी १५ लाख रूपये आरोग्य विभागाकडे वर्ग केले. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते अद्याप मिळालेले नाही.

Beed District Hospital 'sick' despite giving Rs. | १ कोटी १५ लाख देऊनही बीड जिल्हा रूग्णालय ‘आजारी’

१ कोटी १५ लाख देऊनही बीड जिल्हा रूग्णालय ‘आजारी’

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग उदासीन; प्रयोगशाळा, रक्तपेढी साहित्य आणि डिजिटल एक्स-रे यंत्र मिळेना

बीड : जिल्हा रूग्णालयात प्रयोगशाळा व रक्तपेढी साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र द्यावे, यासाठी १ कोटी १५ लाख रूपये आरोग्य विभागाकडे वर्ग केले. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयातून एक्सरे काढावा लागत आहे. यामध्ये त्यांची आर्थिक लूट होत आहे. यावर निर्णय घेऊन हे सर्व देण्यास आरोग्य विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा रूग्णालयातील वाढती रूग्ण संख्या आणि अपुऱ्या सुविधांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सीताबाई मुरकुटे नामक वृद्ध महिला जिल्हा रूग्णालयात उपचार घेत होती. दोन दिवसांपूर्वी तिला डीजीटल एक्सरेची सुविधा नाही, बाहेरून काढा, असा सल्ला सरकारी डॉक्टरांनी दिली. नातेवाईकांनी या वृद्धेला चक्के स्ट्रेचरवरच खाजगी रूग्णालयात नेले. पावसामुळे चिखल असल्याने आणि भरदुपारी हा प्रकार घडल्याने या भयावह परिस्थिती अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली. त्यानंतर फोेटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यावर चौकशी करून रूग्णाला बाहेर पाठविणाºया डॉ.सचिन देशमुख यांच्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कारवाई केली होती.
हाच धागा पकडून विषयाच्या खोलवर जावून माहिती घेतली असता सूत्रांच्या माहितीनुसार मार्च २०१८ मध्ये जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्हा रूग्णालयात विविध सुविधा देण्यासाठी १ कोटी १५ लाख रूपयांचा निधी दिला. या निधीतनू प्रयोगशाळा व रक्तपेढीत लागणारे आवश्यक साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र खरेदी करण्यासंदर्भात बीड आरोग्य विभागाने वरिष्ठांकडे निधी वर्ग केला. मात्र, दीड वर्ष उलटूनही आणि रक्कम अनामत असतानाही हे सर्व देण्यास आरोग्य विभाग उदासिन असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा गलथानपणा सध्या सर्वसामान्य रूग्णांसाठी त्रासदायक ठरू पहात आहे. रूग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी भ्रमणध्वणी न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांचा भ्रमणध्वनी बंद होता, त्यामुळे बाजू समजली नाही.
उच्च स्तरावर प्रस्ताव धूळ खात
च्बीड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियमानुसार प्रस्ताव आणि पैसे शासनाकडे वर्ग केले. मात्र, तब्बल दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शासनस्तरावर हा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Beed District Hospital 'sick' despite giving Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.