बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग झाला सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:34 PM2019-01-04T17:34:30+5:302019-01-04T17:36:55+5:30
महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असा प्रसूती वार्ड तयार झाला आहे.
बीड : मागील महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असा प्रसूती वार्ड तयार झाला आहे. येथे स्वतंत्र चेंजिंग रुमसह स्वच्छता व सुविधा चांगल्या मिळत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत आहेत. दररोज २५ ते ३० प्रसूती येथे होत आहेत.
३२० खाटांचे असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात विविध वार्ड आहेत. २ क्रमाकांच्या वार्डमध्ये महिलांची प्रसूती केली जाते. पूर्वी येथे अपुऱ्या जागेत प्रसूती करताना डॉक्टर व परिचारिकांना अडचणी येत होत्या. शिवाय गर्दीही होत असे. त्यामुळे अधिकच त्रास होत असे. त्यात महिला रुग्णांना कळा येत असल्यामुळे त्या ओरडत असत. त्यामुळे गोंधळ होत असे. मात्र, हाच धागा पकडून प्रसुतीसाठी स्वतंत्र व सुसज्ज असा वार्ड तयार केला. येथे रुग्ण, डॉक्टर व परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. शिवाय १० टेबलवर प्रसूती केली जाते. दररोज २५ ते ३० प्रसूती होत असल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत सुविधा व सेवा अधिक मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
ही टीम घेते परिश्रम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवणीकर, डॉ. शहाणे, डॉ. सुनील मस्तूद, डॉ. नितीन राठोड, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. फरीदा, डॉ. शिंदे, प्रमुख शकुंतला सुतार, शारदा डहाळे, सुषमा घोडके, मनीषा गायकवाड, सविता गर्कळ, बालिका तांदळे, स्वाती देशमुख, विजया ब्रुदूपे, ज्योती जाधव, अनिता भावले, पूनम भिसे, चंद्रकला सुतार, अर्चना जाधव ही टीम परिश्रम घेत आहे.