बीड जिल्हा खड्डेमुक्त करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:36 PM2017-11-22T23:36:41+5:302017-11-22T23:36:51+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे बीड व अंबाजोगाई उपविभागांचा आढावा घेतला. १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
बीड : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे बीड व अंबाजोगाई उपविभागांचा आढावा घेतला. १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे त्यांनी निर्देश दिले. या वेळी अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी यांनी पॉवरपाइन्टच्या माध्यमातून माहिती देत खड्डेमुक्तीचे काम ५० टक्के झाल्याचा दावा केला. यावेळी रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, प्रसंगी सीलकोट रस्ते करावेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असेही पाटील म्हणाले. पत्रकारांशी बोलताना ३२ हजार किलोमीटर रस्ते बांधकामाचा प्रस्ताव आहे. ही कामे झाली तर पुढील १५ वर्षे बघावे लागणार नाही, असे पाटील म्हणाले.