बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:46 AM2018-11-28T00:46:00+5:302018-11-28T00:46:22+5:30

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.

In Beed district, the number of farm ponds increased | बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

बीड जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लक्षांक वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवल्या जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने मगील वर्षातील उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाल्यामुळे व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी देखील शेततळ््यांच्या लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षी बीड जिल्ह्यात मगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत जवळपास ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण केल्यामुळे यावर्षी शासनाच्या वतीने पुन्हा ६ हजार ५०० नवीन शेततळ््याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून पाणी साठवूण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शेतात पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण झाल्यामुळे पारंपरिक पिकांसह इतर पिके घेण्यासाठी शेतक-यांना मदत होणार आहे. जलयुक्त शिवार व शेततळ््यांची कामे योग्यरीत्या झाले तर दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार असल्याचे मत शेतक-यांनी व्यक्त केले आहे.
यावर्षी दुष्काळामुळे अनेक ठिकाणी रबीचा पेरा होऊ शकला नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार व शेततळ््यांच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन कामे सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच मागील लक्षांकामध्ये जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी फक्त ७ हजार ७३१ शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.उर्वरित शेतक-यांना या नवीन योजनेमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे.

Web Title: In Beed district, the number of farm ponds increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.