अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज - हर्ष पोद्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:50 PM2019-11-05T23:50:52+5:302019-11-05T23:51:39+5:30
येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
बीड : येत्या १५ तारखपेर्यंत आयोध्या येथील वादगस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. हा निकाल हा कायद्यानूसार सर्वांना मान्य करावा लागलणार आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व बाजूने तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोद्दार म्हणाले, पोलीस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच सर्व ठाणे प्रमुख व विविध पथकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे. सर्व ठाणेप्रमुख व उप अधीक्षक आपल्या हद्दीत शांतता समितीची बैठक घेत आहेत.
यामध्ये हिंदू-मुस्लिम धर्मातील प्रमुख तसेच तरुणांचा समावेश आहे. त्यांना या निकालाच्या पार्श्वभूमीवर माहिती देऊन पोलीस दलाची भूमिका समजावून सांगितली जात आहे. एखाद्या समाजकंटकाकडून पसरवलेल्या खोट्या अफवेमुळे काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अशा प्रकारच्या होणाºया अनुचित प्रकारात तरुणांना नाहक खेचले जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव देखील या बैठकीत करून दिली जात आहे. सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले.
आपण चुकीचे नसल्यास घाबरण्याचे कारण नाही
जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाकडून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात विविध चौकांमध्ये ‘मॉक ड्रिल’ केले जाणार आहे.
त्यावेळी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने आहेत. त्यामुळे चुकीचे नसल्यावर नागरिकांनी घाबरू नये पोलीस सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत.
सायबर सेलचे लक्ष
सोशल मीडियाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये पसरवल्या जाणाºयांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच अशा वादग्रस्त व खोट्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवणे देखील गुन्हा आहे. त्यावर देखील सायबर सेलकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रसार करणाºयांवर देखील पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
जमावबंदी आदेश लागू
जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बळ वाढवले आहे. सर्व ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. या कालावधीत फटाके फोडणे, गर्दी करणे, विटा, दगड अवैध हत्यारे घेऊन फिरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना दिले आहेत. भारतीय संविधानानूसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम आहे. त्यामुळे आयोध्येतील जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी मान्य करावा. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.