बीड जिल्ह्याला चार दिवसांत दोन वेळा अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:29+5:302021-09-06T04:37:29+5:30

बीड जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट या कालावधीत ३३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान ...

Beed district received heavy rains twice in four days | बीड जिल्ह्याला चार दिवसांत दोन वेळा अतिवृष्टीचा फटका

बीड जिल्ह्याला चार दिवसांत दोन वेळा अतिवृष्टीचा फटका

Next

बीड जिल्ह्यात ३० व ३१ ऑगस्ट या कालावधीत ३३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले होते. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाली. गोदावरी नदीकाठावरील शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक मुख्य पीठ तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर व तीर्थक्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले. तर तालुक्यातील अमृता, सिंदफणा, विद्रूपा, कापशीसह इतर नद्यादेखील दुथडी भरून वाहत होत्या. तर दरवर्षी टंचाईचा सामना करणाऱ्या आष्टी तालुक्यानेहीही पावसाचे रौद्ररूप अनुभवले. धामणगाव हायवे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Beed district received heavy rains twice in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.