बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात निलंबीत, काय आहे प्रकरण?
By सोमनाथ खताळ | Updated: March 25, 2025 12:10 IST2025-03-25T11:53:22+5:302025-03-25T12:10:04+5:30
भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची घोषणा

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात निलंबीत, काय आहे प्रकरण?
बीड : कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेतील अनियमिततामुळे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांचे निलंबण करण्यात आले आहे. भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी ही घोषणा आज सकाळी अधिवेशनात केली.
कोरोनाकाळात डॉ.अशोक थोरात यांचे काम चांगले होते. त्यानंतर त्यांची नाशिक येथे बदली झाली. त्यानंतर डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुर्यकांत गिते आदींनी सीएस म्हणून कारभार घेतला. याच काळात अनियमितता झाली. याची चौकशी करण्यात आली. यामध्ये डॉ.थोरात यांच्यासह डॉ.साबळे, डॉ.गित्ते आणि इतर ९ जणांचा समावेश होता. याच अनुषंगाने आ.मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार मंत्री आबीटकर यांनी थोरात यांचे निलंबण करत असल्याचे सांगितले. परंतू इतर ११ जणांबाबत त्यांनीही काहीही घोषणा केली नाही. डॉ.थोरात यांच्या निलंबणाची बातमी समजताच हा अतिशय चुकीचा निर्णय आहे, अशा प्रतिक्रिया सामान्यांमध्ये उमटल्या.