बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यात राबविण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:38+5:302021-06-06T04:25:38+5:30

परळी : सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक ...

Beed district's 'special day' pattern to be implemented in the state | बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यात राबविण्याचा मानस

बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यात राबविण्याचा मानस

googlenewsNext

परळी : सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी न.प. गटनेते वाल्मीक कराड, रा.यु. कॉं.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, सुंदर गित्ते, सूर्यभान मुंडे, पं.स. सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, सय्यद सिराज, शरद कावरे, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार रुपनर यांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

५ जून रोजी रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी ४ वाजेपर्यंत एक हजारपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

===Photopath===

050621\05_2_bed_14_05062021_14.jpeg

===Caption===

दिव्यांग लसीकरण

Web Title: Beed district's 'special day' pattern to be implemented in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.